Ads (728x90)

मध्य रेल्वेचे बरेच कर्मचारी या कठीण काळात शांतपणे काम करत आहेत.  लॉक-डाऊन दरम्यान गाड्यांची मालवाहतूक चालविण्यासाठी सुरक्षित ट्रॅक राखण्यासाठी विविध ठिकाणी ट्रॅक मेंटेनर  महत्वाची भूमिका बजावत आहेत.  या लॉक-डाउनच्या  परिस्थितीत आपल्या देशाच्या विविध भागात आवश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी मालवाहतूक आणि पार्सल वाहतुकीची सुरळीत वाहतूक सुनिश्चित करते.  माल  वाहतुकीसाठी ट्रॅक देखभालकर्ता (मेंटेनर) ट्रॅक सुरक्षित ठेवत आहेत.  जेव्हा राष्ट्र कठीण काळातून जात आहे आणि कोविड-१९ विरूद्ध लढा देत आहे तेव्हा ट्रॅक देखभाल करणार्‍यांना याचे महत्त्व समजले आहे.  या कठीण परिस्थितीत ट्रॅक देखभाल करणारे आवेशाने आपले कर्तव्य बजावत आहेत.

मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर विभागातील अभियांत्रिकी अधिकारी ट्रॅक देखभाल कामावर बारीक लक्ष ठेवत आहेत.  प्रत्येक सुरक्षा उपकरणे ट्रॅक देखभालकास दिली जातात.  त्यांच्या संबंधित विभागाचे  वरीष्ठ विभागीय अभियंते/समन्वय उन्हाळ्याच्या खबरदारीसाठी त्यांच्याशी वैयक्तिकरित्या संवाद साधत आहे आणि त्यांची कामे करीत असताना सामाजिक अंतर राखण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत.  सामाजिक अंतर आणि सुरक्षित कार्यासाठी सहायक विभागीय अभियंता ट्रॅक-मॅनला समुपदेशन करीत आहेत. सेक्शन इंजिनिअर   कर्तव्यावर असलेल्या प्रत्येक ट्रॅक देखभालकाला मास्क, सेनिटायझर्स, साबण आणि हातमोजे वाटप सुनिश्चित  करत आहेत.

 याशिवाय मध्य रेल्वेच्या ट्रॅकमन (महिला) ड्युटीवरील आपल्या सहकारी आणि  रेल्वे कर्मचा-यांसाठी मास्क तयार करत आहेत.  श्रीमती  मालती, चंद्रपूर येथील महिला ट्रॅकमन, श्रीमती  कल्पना नेवरे, चंद्रपूर येथील महिला ट्रॅकमन, मोनिका रघु वाघमारे अजनी येथील महिला ट्रॅकमन आणि रंजना क्षीरसागर, अजनी येथील महिला ट्रॅकमन यांनी प्रत्येकी १५० मास्क तयार केले आहेत आणि आणखी प्रत्येकी १५० मास्क तयार करणार आहेत.  अशा प्रकारे महिला ट्रॅकमन त्यांच्या घरी स्वेच्छेने एकूण १,२०० मास्क तयार करणार आहेत.  कोविड-१९ च्या विरोधात लढणार्‍या सर्व  नायकांस सलाम.

Post a Comment

Blogger